नगर शहर विकासयुक्त व भयमुक्त करणार : डॉ. विखे

अहमदनगर :

नगर शहराची प्रतिमा काही प्रवृत्तींमुळे मलीन झाली असून येथील राजकीय दहशत विकासाला मारक ठरली आहे. सुरक्षित आणि दहशतमुक्त शहराचा चेहरा करण्याची ग्वाही महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.

नगर शहर व तालुक्यातील प्रचार सभांमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, सभागृहात आपले प्रश्न मांडण्याची जबाबदारी पार पाडु न शकणारे आज या भागातील प्रश्नांवर बोलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेवून अंमलबजावणी सुरू केली आहे. नगर दक्षिण भागातील शेती व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही निवडणूक लढवीत आहे.

यावेळी माजीमंत्री बबनराव पाचपुते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, जि. प. सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, अमोल बेरड, किशोर बेरड, अनिल करांडे, राजू मगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. नगर शहरील औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग आणण्यासाठी काम करण्याचे आश्वासन डॉ. विखे यांनी दिले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*