धनंजय मुंडे यांची विखे व पंकजाताई यांच्यावर टीका

अहमदनगर :

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अखेरच्या दिवशी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पाथर्डीत सभा घेतली. या सभेत त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यावर टीका केली.

या सभेला माजी मंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप, प्रताप ढाकणे, चंद्रशेखर घुले, राजेंद्र फाळके , सोमनाथ धुत, दादासाहेब मुंडे, राजाभाऊ दौड आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले की, मी विरोधी पक्षनेता म्हणून १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी बाहेर काढले. माझा अनुभव कमी असताना मी हे विधानपरिषदेत केले मग विधानसभेत राधाकृष्ण विखे पाटलांना का जमले नाही? त्यांच्या डाल मैं कुछ काला है..!

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*