मोदींना फासावर लटकावू; काँग्रेस नेत्यांचे बेताल वक्तव्य

छत्तीसगड:

सातत्याने वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा सपाटा भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी लावला आहे. यात आता स्थानिक पातळीवरील नेतेही मागे राहिले नाहीत. छत्तीसगडमधील रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार लालजीत राठिया यांची जीभ घसरली आणि त्यांनी मोदींना फाशीवर लटकवण्याची भाषा केली. याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटू शकतात.

राठिया हे प्रचारसभेत बोलत असताना त्यांनी मतदानाचे आवाहन केले आणि त्यानंतर हे वादग्रस्त विधान केले. यापूर्वीही राठिया यांनी अनेकांवर जहरी टीका करत वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. आता या वक्तव्यामुळे मोठा वाद होऊ शकतो.
यापूर्वी निवडणुक आयोगाने वादग्रस्त वक्तव्य करणार्यांवर कारवाई करत प्रचारबंदी केली होती. पण तरीही वादग्रस्त विधानांच् सुळसुळाट वाढत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*