अभिनेता रजनीकांतबाबतची ही चूक अधिकाऱ्यांना नाडणार

चेन्नई :

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. विविध टप्प्यांमधे हे मतदान सुरू आहे. काही ठिकाणी मतदान यंत्र खराब झाल्यामुळे मतदान थांबले जात आहे तर काही ठिकाणी उमेदवार किंवा ग्रामस्थ यांच्यामुळे मतदान थांबले जात आहे. पण पहिल्यांदाच निवडणुक अधिकार्याने चुक झाल्याचे समोर येत आहे. त्यातही रजनिकांत यांच्या बाबत हि चुक झाल्यामुळे निवडणुक अधिकार्याना ही चुक महागात पडू शकते.

रजनिकांत यांच्या डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावल्यामुळे हि चूक झाल्याचे निवडणुक अधिकार्यांच्या लक्षात आले. कदाचीत शाई लावणारा अधिकारी हा रजनिकांत यांच्या प्रेमात असेल आणि चक्क रजनिकांत समोर आल्यावर कुठल्या हाताच्या बोटाला शाई लावायची हे लक्षात न आल्यामुळे हि चुक झाली असल्याची चर्चा सामान्य नागरिक मिश्कीलपणे करत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*