अजित पवारांचे भाजप नेत्यांना फोन

पुणे :

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या महाराष्ट्रभर प्रचारसभा घेत आहेत. याचवेळी मुलगा पार्थ पवार यांच्यासाठीही ते तयारी करत आहेत. ‘मी उपमुख्यमंत्री असताना तुम्हाला मदत केली आता तुम्ही पार्थला मदत करा’ असा फोन ते सेना व भाजप नेत्यांना करत असल्याचे कळते.

मावळ मतदारसंघातुन अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे ऊभे आहेत. त्यांच्याविरूद्ध शिवसेनेकडून श्रीरंग बारणे आहेत. अजित पवार यांच्या फोनची चर्चा या मतदारसंघात चांगलीच रंगली आहे. पार्थ हे पहिल्या भाषणापासुनच ट्रोल झाले. त्यामुळे पार्थ यांनी ही निवडणुक जड असल्याची चर्चा करण्यात येते. मात्र, पवार कुटुंबीय व राष्ट्रवादी विजयासाठी आक्रमक झालेली आहे. तसेच अजित पवार आणि पवार कुटूंबीय ज्या पद्धतीने प्रचार करत आहेत त्यावरून हे दिसुन येते की पवारांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची झाली आहे.
आता अजित पवारांचा फोन गेल्यावर सेना भाजपचे नेते कुणाला मदत करतील यावर पार्थ यांचे भविष्य अवलंबून असेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*