साध्वी प्रज्ञा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ

साध्वी प्रज्ञा सिंग यांना निवडणुक आयोगाची नोटीस

दिल्ली :

शहिद हेमंत करकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव केल्यामुळे कालपर्यंत साध्वी प्रज्ञा सिंग चर्चेत होत्या. आता निवडणुक आयोगाने त्यांना दुसर्या आक्षेपार्ह विधानामुळे नोटीस पाठवली आहे. बाबरी मस्जीद प्रकरणा संदर्भात वादग्रस्त विधान केल्यामुळे हि नोटीस पाठवली गेली आहे. त्या मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. त्यांना भाजपने भोपाळ येथे काँग्रेस नेते दिग्वीजय सिंह यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे.

मी बाबरी मशिदीवर चढले होते आणि मशीद पाडण्यास मदत केली होती असे विधात त्यांनी केले. बाभरी मशीदीचा ढाचा तोडण्यास ईश्वराने मला संधी दिली व त्याचा मला गर्व आहे असेही ती म्हणाली. यावर निवडणुक आयोगाने त्वरीत कारवाई केली. वादग्रस्त भाषणमुळे समाजात द्वेष निर्माण होतो असे सांगत निवडणुक आयोगाने सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*