मिलींद देवरा यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई:

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद देवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी आचारसंहिता नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ते दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य त्यांनी केले असे म्हणत शिवसेनेने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. निवडणुक आयोगानेही त्यांना परवा(19 तारखेला) नोटीस पाठवली होती.

एका जैन मंदिराच्या बाहेर शिवसेनेने मांस शिजवले असा उल्लेख त्यांनी एका भाषणात केला होता. याचाच आधार घेत शिवसेनेने हि तक्रार दाखल केली आहे. यामुळे देवरा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. देवरा यांच्यावरील गुन्ह्यामुळे एकूण मुंबई काँग्रेसच्या अडचणीतही वाढ होऊ शकते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*