विधानसभेला राज ठाकरे आघाडीसोबत : फडणवीस

मुंबई :

गेल्या महिनाभरापासून भाजपाचे नेते हे राज ठाकरेंना लक्ष्य करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत आघाडीसोबत असतील असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावेळी ते वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी बोलत होते.

जी गोष्ट बोलताना लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट राज हे अभिमानाने सांगतात. ते निवडणुक लढवायची नाही असे सांगतात, एखाद्या पक्षासाठी एवढी लाजीरवानी बाब दुसरी असु शकते का? असे म्हणत त्यांनी राज यांना टीकेचे लक्ष्य केले. राज हे या निवडणुकीत ‘नाॅन प्लेयर’ आहेत त्यामुळे आम्ही त्यांना फारशी उत्तरे देत नाहीत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी साध्वी प्रज्ञा सिंग यांचे शहिद हेमंत करकरे यांच्याविषयीचे वादग्रस्त विधान हे अत्यंत अयोग्य होते अशी स्पष्ट भुमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*