शिवभक्तांची जात काय काढता; धनंजय मुंडे यांचा आढळरावांना प्रश्न

पुणे :
डॉ. अमोल कोल्हे यांची जात काढणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांनी विसरू नये की कोल्हे शिवरायांचे भक्त आहेत. त्यांची जात काय काढता अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना उमेदवार खासदार आढळराव पाटील यांना सुनावले.

शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अभिनेते डॉ. कोल्हे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे यांनी तळेगाव ढमढेरे, मांडवगण खराटा (ता. शिरूर) येथे जाहीर सभा घेतल्या. यावेळी माजी आमदार अशोकबापू पवार, दिलीपराव ढमढेरे, पोपटराव गावडे, प्रदीपदादा कंद आदी उपस्थीत होते.

मुंडे म्हणाले की, डॉ. कोल्हे हा छत्रपतींचा मावळा आहे. या मावळ्याच्या गर्जनेने विरोधकांची पळता भुई थोडी झालेली आहे. या मावळ्याला दिल्लीत पाठवा.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*