पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार : आठवले

भोपाळ :

देशातील दहशतवाद व नक्षलवाद संपविण्यासह पाकिस्तानला धडा शिकविण्याची ताकद एकमेव नरेंद्र मोदी यांच्यामध्येच आहे. भारतीय जनतेला याची माहिती अआहे. त्यामुळेच पुन्हा एकदा देशात मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

भोपाळ येथे रिपाई (आठवले गट) यांच्या बैठकीत ते बोलत होते. आठवले म्हणाले की, प्रधानमंत्री मोदी यांनी मागील ५ वर्षांत कष्टकरी, गरिब व मध्यमवर्गीयांसाठी चांगले काम केले आहे.  हे सामाजिक घटक त्यांना नक्कीच मतदान करून पुन्हा सत्तेची संधी देतील.

मध्यप्रदेश राज्यातील ४० पैकी ५ जागांवर रिपाईने आपले उमेदवार स्वबळावर उभे केले आहेत. तर, उरलेल्या ३५ ठिकाणी भाजपला या पक्षाने पाठींबा दिलेला आहे. त्या पाचही जागांवर आपल्या पक्षाचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होण्याचा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*