मोदी-शाह म्हणजे अहिरावण-महिरावण : रामदास फुटाणे

पुणे :

आपल्या शैलीदार कविता आणि शब्दांच्या जोरावर राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवण्याची ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांची क्षमता वादातीत आहे. याच फुटाणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहिरावण तर, त्यांचे उजवे हात भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह यांना महिरावण अशी उपमा बहाल केली आहे.

पिंपरी-चिंचवड येथील साहित्य कट्टा कार्यक्रमात त्यांनी राजकीय भाष्य करून मोदी-शाह यांना अहिरावण-महिरावण याच्या उपमा बहाल केल्या. ते म्हणाले की, देशात भाजपची सत्ता असल्यास काही फारक पडणार नाही. मात्र, सध्या देशात महाभक्तांची सत्ता आहे.

या दोन्ही रावनांनी देश आपल्या मुठ्ठीत घेतला आहे. तो बाहेर काढण्याची खरी जबाबदारी साहित्यिकांची असल्याचे आवाहान फुटाणे यांनी केले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*