निकालाचे आकडे व सर्वेक्षणातुन ठरणार मतदारसंघ

पुणे :

राज्यातील लोकसभेच्या निवडणूक निकालाची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे. भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या विजयी जागांसह आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित याच निकालाची आकडेवारी व राजकिय सर्वेक्षणातुन ठरणार आहे.

सध्या कागदावर भाजप-सेनेची ताकद राज्यात मोठी आहे. तीच ताकद कितपत टिकून आहे याचे गणित 23 मे रोजीच्या निकालातून स्पष्ट होईल. तसेच मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या चौरंगी व पंचरंगी लढतीमुळे निर्माण झालेला उमेदवारीचा पेच याद्वारे काहीअंशी मिटणार आहे. मात्र, तरीही फक्त आकडेवारी आणि त्याचे गणित लक्षात न स्थानिक समीकरण आणि सर्वेक्षण यातून युती व आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सोडविला जाणार आहे. त्यासाठी आताच एजन्सी कामाला लागल्या आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*