म्हणून त्यांनी ‘गोकुळा’त घुसविल्या म्हशी..!

कोल्हापूर :

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हिताचे धोरण ठेवण्याऐवजी शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी भूमिका गोकुळ दुध संघाने घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पशुखाद्याचे भाव वाढविताना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याच्या निषेधार्थ जिल्हा शिवसेनेने गोकुळच्या कार्यालयात म्हशी घुसवून आंदोलन केले.

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण पेटलेले आहे. आगामी विधानसभा निवडणूक समोर ठेऊन खासदार धनंजय महाडिक व राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या गटाला खिंडीत पकडण्यासाठी सध्या गोकुळला विशेष महत्व आले आहे. त्याचाच भाग म्हणून पशुखाद्याच्या दरवाढीच्या निमित्ताने आता शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी गोकुळच्या भूमीवर एकमेकांना आव्हान देत आहेत.

जिल्हाभर आंदोलन पेटविण्याची घोषणा सेनेच्या नेत्यांनी यानिमित्ताने केली आहे. पशुखाद्याचे दर कमी करतानाच दुधाचे भाव वाढविण्याची मागणी सेनेने केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*