ही ऑनलाइन कंपनी विकणार किराणा दुकानातून सामान..!

मुंबई :

ऑनलाईन कंपन्या स्वस्तात मस्त माल विकत असतानाच ग्राहकांना यापासून होणारा फायदा रोखण्यासाठी केंद्र सरकारने या व्यवसायाला जाचक अति घातल्या. त्यामुळेच आता यातून मार्ग काढण्यासाठी अमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या नवीन मार्ग शोधात आहेत. त्यातूनच फ्लिपकार्ट कंपनीने तेलंगाना भागात विशेष प्रकल्प हाती घेत किराणा दुकानदारांना भागीदार बनवीत स्मार्टफोन विकण्याची क्लुप्ती लढविली आहे. भविष्यात हाच प्रकल्प देशभरात ही कंपनी राबविणार असल्याची चर्चा आहे.

तेलंगाना राज्यातील ८०० छोट्या दुकानदारांच्या मदतीने फ्लिपकार्ट कंपनीने हा व्यवसाय सुरू केला आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबविला जात आहे. रिलायंस रिटेल ही कंपनी देशभरातील लाखो किराणा दुकानदारांच्या मदतीने नवीन व्यवसाय उभा करण्याच्या विचारात आहे. त्यालाच शह देत आता या क्षेत्रातील संधी हेरून फ्लिपकार्ट नव्या पद्धतीच्या व्यवसायात घुसल्याच्या चर्चा आहेत.

फ्लिपकार्ट कंपनीच्या मिंट्रा या ऑनलाईन स्टोअरने आता देशातील ५० शहरांत सुमारे ९ हजार दुकानदारांच्या मदतीने कपडे व इतर वस्तू विकण्यास सुरुवात केली आहे. त्याचीच आवृत्ती म्हणून आता फ्लिपकार्ट कंपनी या नव्या अवतारात बाजारात दाखल होणार असल्याची चर्चा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*