त्या मुद्यावरून शिवसेना-भाजप भिडले..!

मुंबई :

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजप या सत्ताधारी मित्रपक्षांच्या मधून विस्तवही जाणार नसल्याचे चित्र होते. मात्र, देशाची हवा लक्षात घेऊन राजकीय अपरिहार्यतेतून हे दोन्ही ‘नैसर्गिक’ मित्रपक्ष एकत्र लोकसभा लढले. मात्र, आता महाराष्ट्रातील चारही टप्प्याचे मतदान पार पडल्यावर पुन्हा एकदा हे पक्ष एकमेकांना भिडतात की काय अशीच शक्यता बुरख्याच्या मुद्यामुळे निर्माण झाली आहे.

शेजारील श्रीलंका या देशात इस्लामिक कट्टरपंथीय आयसीसच्या गटाने दहशतवादी हल्ला केला आहे. या भीषण बॉम्बस्फोटामुळे श्रीलंका सरकारने त्या देशात बुरखा (नकाब) वापरण्यास सरसकट बंदी घातली आहे. तसाच निर्णय भारतात घेण्याची मागणी शिवसेनेने सामना या मुखपत्रातून केली आहे. ‘रावणाच्या देशातील निर्णय रामाच्या देशात का लागू होत नाही’, असा प्रश्न शिवसेनेने केला आहे. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधाचा सूर आळवला आहे. तर, भाजपाचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनीही पक्षाची याबद्दल भूमिका जाहीर करताना थेट सेनेच्या विरोधात वक्तव्य केले आहे.

एकूणच या मुद्यावर आता भाजप आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध पेटणार असेच दिसत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*