सट्टाबाजाराची पसंती भाजप-सेनेलाच..!

मुंबई :

महाराष्ट्र राज्यात पहिल्या चार टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता कोण जिंकणार आणि कोण हरणार याचीच चर्चा आहे. अनेकांनी देशात सत्ताबदल होण्याचा अंदाज व्यक्त केलेला असतानाच सट्टाबाजाराने मात्र, पुन्हा एकदा सर्वाधिक जागांसह भाजप-शिवसेना युतीला मतदार कौल देतील यावर शिक्कामोर्तब करूनही टाकले आहे.

देशात भाजपच्या जागा कमी होतानाच काँग्रेसच्या जागा किमान दुप्पटीने वाढण्याची शक्यता या अनधिकृत बाजाराने व्यक्त केली आहे. भाजपच्या 230 ते 245 जागा येतील यासाठी सट्टाबाजाराचा दर 23 ते 40 पैसे आहे. तर, काँग्रेसला 90 ते 105 जागा मिळतील असे भाकीत वर्तवित त्याचा दर 28 ते 60 पैसे देण्यात आलेला आहे.

एकूणच देशाचा ट्रेंड लक्षात घेता यंदा स्वतंत्र कोणत्याही एका पक्षाची सत्ता देशात येणार नसून आघाडी किंवा युतीची सत्ता येणार असेच सट्टाबाजाराने म्हटले आहे. अशा त्रिशंकू स्थितीत देशात नेमकी कोणाची सत्ता येणार हेच अस्पष्ट आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*