तर गडकरी पंतप्रधान होतील : स्वामी

दिल्ली :

देशात सध्याचा ट्रेंड लक्षात घेता भाजपला जास्तीतजास्त 230-235 जागा मिळण्याची शक्यता दिसते. अशावेळी भाजपच्या नेतृत्वात बदल अपेक्षित असून सहमतीने मंत्री नितीन गडकरी यांनाच पंतप्रधान पदावर बसण्याची संधी मिळेल असे भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

एका वेबसाईटवर मुलाखत देताना स्वामी यांनी देशाच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, 230-235 जागा भाजपच्या आणि मित्रपक्षांच्या 25-30 जागा आल्यास इतर पक्षांची मदत सरकार स्थापनेसाठी घ्यावी लागेल. अशावेळी कार्यक्षम मंत्री असलेल्या गडकरी यांना संधी मिळाल्यास आंनद वाटेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*