पतंजलीने दाखविली या कंपनीत विशेष ‘रुची’..!

मुंबई :

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीची घोडदौड जोरात सुरू आहे. याच जगप्रसिद्ध कंपनीने आता रुची सोया या कंपनीचे अधिग्रहण करण्याची तयारी दाखवली आहे.

यानिमित्ताने पतंजली आयुर्वेदच्या या पहिल्या अधिग्रहण प्रयत्नाला यश मिळाल्यास ही कंपनी आणखी मोठी होणार आहे. खाद्यतेल निर्मितीतील रुची सोया लिमिटेड कर्जाच्या विळख्यात सापडली आहे. या कर्जातून मुक्तीसाठी बँकांनी रुची सोयाच्या ४,३५० कोटी रुपयांच्या बोलीला मंजुरी दिलेली आहे. त्यामध्ये पतंजली कंपनीने रुची दाखविली होती.

रुचीने विविध बँकांचे सुमारे ९ हजार ३४५ कोटी रुपये थकविले आहेत. त्याची वसुली करण्यासाठी बँकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच हा भाग आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*