विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार सज्ज

मुंबई :

आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी केली आहे. टीव्ही 9 मराठी वाहिनीवर बोलताना त्यांनी याबाबतची दिशा स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी दुष्काळी उपाययोजना राबविण्यात राज्य सरकार कमी पडत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, भाजप-शिवसेना सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेऊन तातडीने कार्यवाही करावी. दुधाचा प्रश्न आणि कोरडवाहू शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*