ही आहे का हिंमत; मोदींचे काँग्रेसला खुले चॅलेंज

दिल्ली :

माजी पंतप्रधान राजीव गांधी भ्रष्टाचारी नं. १ म्हणूनच दिवंगत झाल्याची बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली होती. त्यावर काँग्रेसने त्यांना धारेवर धरलेले असतानाच पुन्हा एकदा मोदींनी राजीव गांधींच्या नावाने निवडणूक लढविण्याचे खुले चॅलेंज काँग्रेसला दिले आहे.

झारखंडमध्ये भाजपच्या रॅलीत बोलताना मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसला राजीव गांधी यांच्या मुद्यांवर आणून सोडले आहे. देशाच्या विकासावर बोलण्याचे आव्हान राहुल गांधी यांनी दिले आहे. त्यावर काहीही न बोलता थेट बोफोर्स, कोळसा घोटाळा या जुन्याच मुद्यांवर ही निवडणूक नेण्यासाठी मोदींनी योग्य पध्दतीने शब्दच्छल केला आहे.

हर बूथ पर मोदी असा नारा देत उत्तर भारतात मोदींनी ही निवडणूक विकासाच्या मुद्यांवर न ठेवता पुन्हा एकदा धार्मिक दहशतवाद व धार्मिक राष्ट्रवाद या मुद्यांवर आणून ठेवली आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणता पक्ष जिंकणार याचे कोडे आणखी जटील झाले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*