ग्लोबल फार्मिंग | बांगलादेश कृषिक्रांतीच्या मार्गावर

शेतमाल उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतीला मॉर्डन करण्याचा प्रस्ताव बांगलादेशच्या वतीने पारीत करण्यात आलेला आहे. भारतासह जगभरातील यंत्रसामुग्री शेतीमध्ये विनासायास वापरण्याचे धोरण तेथील सरकारचे आहे. त्यामुळेच हा देशही आता तांदूळ व इतर शेतमालाच्या उत्पादनात भरारी घेत आहे.

शेती संदर्भातील विविध तंत्र व अवश्यक असणारी यंत्र सामुग्री बांधावर पोहचवण्यासाठी सरकारच्या वतीने योजना आखण्यात आली आहे. योजने अंतर्गत प्रत्येक गावात शेती अवजारांची बँक निर्मितीला चालना देण्यात येत आहे. मिरपुर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेती अवजारांची बँक निर्माण झाली आहे.

जनुकीय अभियांत्रिकीसह सर्व संशोधनाचा उपयोग करून देशाला पुढे नेण्यासाठीचे प्रयत्न बांगलादेश करीत आहे. त्यानुसार आता या देशात नुकतीच गोल्डन राईस टेस्टलाही परवानगी मिळाली आहे.

लेखक : विशाल केदारी (शेती विषयाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*