वैद्यकीय संशोधनात महिलांचे योगदान मोठे असेल : डाॅ.राजेंद्र विखे पाटील

पुणे :

जगाच्या पाठीवर यापुढील काळात वैद्यकिय संशोधनाची मोठी संधी निर्माण होणारं आहे या संशोधनात महिलांची भूमिका निश्चित मोठी असेल असे मनोगत डाॅ. राजेंद्र विखे पाटील यांनी व्यक्त केले

गोवा मेडिकल काॅलेजच्या वतीने आयोजित गोमीकाॅन २०१९ या दोन दिवसीय आरोग्य परिषदेचे उद्घाटन गोव्यात प्रवरा अभिमत विद्यापीठाचे उपकुलपती डाॅ राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गोवा मेडीकल काॅलेजचे अधिष्ठाता डाॅ शिवानंद बांदेकर, डाॅ. गोमस व्यासपिठावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना डाॅ.विखे पाटील यांनी वैद्यकिय शिक्षणात होत असलेले बदल आणि संशोधनाच्या विविध वैद्यकिय शाखांच्या माध्यमातुन आपणांस पुढे नेतां येईल. पण संशोधनाची रुजवात होण्यासाठी या आरोग्य परिषदाची भूमिका महत्वाची असल्याचे सांगत परिषदेत विद्यार्थ्यांनीची संख्या जास्त आहे यामुळे संशोधनात भविष्यात महिलांची योगदान मोठे असले पाहीजे असा आशावाद व्यक्त केला

यावेळी डाॅ शिवानंद बांदेकर यांनी पुस्तकी ज्ञानातुन बाहेर पडुन विद्यार्थ्यांनी संशोधन करत संशोधन निबंध संशोधन पत्रिकेतून सादर केले पाहीजे असे आवाहन केले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*