गुजरातमध्ये 2009 ची पुनरावृत्ती होणार; काँग्रेसला अपेक्षा

मुंबई :

देशात पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी गुजरात राज्यात 2009 च्या निकालाची पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा राष्ट्रीय काँग्रेस नेतृत्वाला आहे. त्यांची ही अपेक्षापूर्ती होणार की गुजरात पुन्हा एकदा भाजपला 100 टक्के साथ देणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शेजारील गुजरात राज्य देशातील सत्ताकेंद्र बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी गुजरातला त्या उंचीवर नेले आहे. गुजराती जनतेनेही मागील लोकसभा निवडणुकीत मोदी-शहांच्या भाजपला 26 च्या 26 जागा देऊन साथ दिली होती. तत्पूर्वी 2009 च्या निवडणुकीत गुजराती समाजाने भाजपला 14 आणि काँग्रेसला 12 जागा देत समतोल राखला होता.

विधानसभा निवडणुकीत गुजरातने 182 पैकी 100 जागा भाजपला दिल्या आहेत. मात्र, त्याचवेळी काँग्रेसला 70 जागा देताना या राज्याने समतोल राखला होता. मोदींच्या पंतप्रधान पदाच्या सुवर्णकाळात तिथे भाजपची पीछेहाट झाली होती. 2017 च्या त्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजकारणाने उभारी घेतली होती. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 2009 ची पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा काँग्रेस नेतृत्वाला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*