नगरची जागा जिंकण्याचा राष्ट्रवादीला विश्वास

अहमदनगर :

लोकसभा निवडणुकीत कांटे की टक्कर झालेल्या नगरच्या जागेवर राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचाच विजय होण्याचा विश्वास जिल्हा व राज्यातील नेत्यांना वाटत आहे. अनेकांनी वेळोवेळी याबाबत जाहीर भावनाही व्यक्त केली आहे.

आमदार जगताप यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जोरदार प्रचार करून येथे कांटे की टक्कर दिली आहे. राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडून उमेदवारीची शक्यता मावळल्याने आघाडी सोडून विखे यांनी भाजपची उमेदवारी मिळवली. त्यांचे वडील व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही जोरदार प्रचार केला. भाजप व शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांनी विखे यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.

तर, जगताप यांच्या विजयासाठी जेष्ठ नेते शरद पवार व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विशेष लक्ष घातले आहे. या दोघांसह पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतर नेत्यांनी नगरच्या जागेवर यंदा राष्ट्रवादीच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे जगताप व जिल्हा राष्ट्रवादीचा उत्साह दुणावला आहे. मात्र, दि. 23 मे रोजीच्या निकालानंतर खरे चित्र स्पष्ट होईल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*