मग ते विचारवंत कसले; ठाकरेंचा प्रश्न

मुंबई :

कलावंत व विचारवंत यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल जगजाहीर भूमिका घ्यायलाच पाहिजे. जर, ते विचार करून बोलता नसतील, घाबरून विचार मांडत असतील, तर असले अभ्यासक कसले विचारवंत आहेत, असा संतप्त प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. ते म्हणाले की, दहशतवाद हा कोणत्याही धर्माचा नसतो. दहशतवाद हे वाईट कृत्य करणारे कोणत्याही धर्माचे असोत, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. तसेच देशभक्त असल्याचा आव आणून कोणीही देशाला फसवू नये. विचारवंत म्हणजे विचार करणारा. अर्थात चांगला व सकारत्मक. मग त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात भूमिका घ्यायला नको का, असाही प्रश्न ठाकरे यांनी केला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*