ट्विटर ट्रेंडमध्ये मोदी जोरात..!

पुणे :

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील ५९ जागांसाठी दि. १९ मे रोजी मतदान होत आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज नेशन या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक दावे केले आहेत. त्यामुळे तसेच भाजपच्या ‘देश मोदी के साथ’ या घोषणेमुळे मोदी ट्विटर ट्रेंडमध्ये जोरात आहेत.

भारत देशातील जनता मोदींच्या समवेत असल्याचा दावा करीत भाजपच्या ट्रोलर्सनी मोदींच्या बाजूने जोरात प्रचार सुरू ठेवला आहे. त्यातच मोदींनी मुलाखतीत रडार आणि डिजिटल कॅमेरा यांच्याबद्दल बोलून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यावर कॉंग्रेस आणि देशातील लोकशाहीवादी तरुणांनी मोदींची खिल्ली उडविणारे ट्रेंड निर्माण केले आहेत. ‘क्लौडी मोदी’ आणि ‘gadgetgobi’ हे ट्रेंड आणले आहेत.

सध्या ट्विटरवर देश मोदी के साथ सर्वाधिक ट्रेंडमध्ये आहे. त्याखालोखाल विरोधकांच्या ट्रेंडला सोशल मिडीयावर प्रतिसाद मिळत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*