गांधींपेक्षा मोदींच्या सभा जास्त, तर प्रवास कमी

दिल्ली :

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देशाच्या केंद्रस्थानी दोनच नेते होते. ते म्हणजे भाजपचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी. या दोघांच्या नेतृत्व क्षमतेचा कस लावणारी ही निवडणूक आहे. त्यात दोघेही तुल्यबळ ठरण्याची चिन्हे आहेत.

पप्पू नाही तर पप्पा अशी राहुल गांधी यांची इमेज या निवडणुकीत बदलली आहे. तर उलटसुलट व न पटणारे दावे करून मोदींची इमेज गारुड करणारा नेता अशी बदलली आहे. मात्र, तरीही मोदींना पुन्हा एकदा सत्तासोपन चढण्याची आशा आहे, तर देशात परिवर्तन होण्याचा विश्वास गांधी यांना वाटतो. त्याचे उत्तर निकालानंतर स्पष्ट होईल.

प्रचारात (दि. 1 एप्रिल ते 12 मे) या कालावधीत आतापर्यंत मोदींनी देशभरात 104 सभा घेतल्या आहेत. त्याचवेळी विरोधी पक्ष म्हणून गांधी यांनी 94 सभा घेऊन प्रचाराला रंगत आणली आहे. एकूण सभा घेण्यात मोदी आघाडीवर आहेत. त्याचवेळी एकूण प्रवासात मात्र राहुल गांधी यांनी मोदींवर मात केली आहे. प्रचाराच्या कालावधीत मोदींनी 1 लाख 6 हजार 253 किलोमीटर, तर राहुल गांधी यांनी 1 लाख 12 हजार 585 किलोमीटर प्रवास केला आहे. एकूणच दोन्ही नेत्यांनी देश पिंजून काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*