लोकसभेच्या रिंगणात गुन्हेगारांचा टक्काही मोठाच..!

मुंबई :

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नेहमीप्रमाणे विकासाचा दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींसह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनी जनतेच्या दरबारात आपले नशीब अजमावले आहे. अशा गुन्हेगारांना जनता भीक घालते की नाही हे निकालातून स्पष्ट होईल.

राजकिय भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी यावर फक्त चर्वण करताना भारतीय मतदारांची पसंती असल्याच उमेदवारांना असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्षही उमेदवार म्हणुन त्यांना पसंती देत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 8049 जणांनी उमेदवारी केली आहे. त्यापैकी 19 टक्के व्यक्तींवर सामान्य तर, उरलेल्या 13 टक्के व्यक्तींवर गंभीर गुन्हे आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले एकूण 32 टक्के उमेदवार असून त्यातुल 29 टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यांना मतदार यंदा पसंती देणार की घरी बसविणार, हे दि. 23 मे रोजीच्या निकालात स्पष्ट होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*