लोकसभेच्या उमेदवारीतही महिलांचा टक्का नगण्य..!

पुणे :

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी मतदान झाल्यानंतर दि. 23 मे 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर देशात नवीन सत्ताधारी शपथ घेतली. त्यात महिलांचा टक्का पुन्हा एकदा नगण्य राहणार आहे. कारण एकूण उमेदवारांमध्ये फक्त 9 टक्के महिलांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावले आहे.

लोकसंख्येच्या सुमारे 50 टक्के असलेल्या महिलांसाठी राजकारण हे क्षेत्र अजूनही लांबचाच पल्ला आहे. त्याचीच झलक प्रत्येक पक्ष उमेदवार ठरविताना दाखवीत आहे. त्यामुळेच महिलांचा टक्का अजूनही खूप कमी आहे. यंदाच्या लोकसभेसाठी देशभरात 8049 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी फक्त 9 टक्केच महिला असल्याची आकडेवारी असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स यांनी जाहीर केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*