सत्ता म्हणजे विष, परंतु… : राहुल गांधी

दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा व नॉन पॉलिटिकल मुलाखती जोरात असताना त्यांचे मुख्य प्रश्नावरील मौन कायम आहे. त्याचवेळी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी देशाच्या समस्या, काँग्रेसच्या चुका व व्हिजन यावर भरभरून बोलत आहेत. त्यातच त्यांनी आता ‘पॉवर इज पॉइझन’ असे सांगताना त्याची अपरिहार्यता सांगितली आहे.

आऊटलूक या मासिकला दिलेल्या मुलाखतीत गांधी यांनी ‘सत्ता हे विष आहे. मात्र, तरीही तुम्ही त्या विषयापासून दूर नाही राहू शकत. कारण परिवर्तन त्याच विषाद्वारे होऊ शकते’, असे म्हटले आहे. या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे चुकलेले निर्णय, अर्थव्यवस्थेची दशा व दिशा, देशाची राजकीय दिशा यावर मुक्तचिंतन केले आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1129739812087500800?s=19

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*