निंबळकमध्ये रंगला कुस्ती आखाडा

अहमदनगर :

तालुक्यातील निंबळक-इसळक गावात मैदानी कुस्त्यांची जंगी मेजवानी कुस्ती शौकिनांना पाहायला मिळाली. सुमारे ५ लाख रुपयांची बक्षिसे या आखाड्यात देण्यात आली. महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी या आखाड्यात येऊन आपली ताकद अजमावली.

या आखाड्यातील कुस्त्या पाहण्यासाठी जिल्ह्यातून हजारो शौकीन उपस्थित होते. खंडोबा यात्रेनिमित्त कै.संजय लामखडे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील शेळके, माधवराव लामखडे, राधाकृष्ण वाळूंज, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बन्सी कराळे, बबनराव नाट, आप्पासाहेब मुळे, बाबासाहेब खर्से, बाळासाहेब निमसे, सुरेश सुंबे, दत्ता पाटील सप्रे, हनुमंत कातोरे, साहेबराव सप्रे, निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे, केतन लामखडे, अजय लामखडे, सयाराम बानकर, देवा होले, संजय जपकर, पोपट ढगे, बाळासाहेब कोतकर, भाऊराव गायकवाड, वसंत पवार, विठ्ठल जपकर, धनंजय खर्से, उपसरपंच घनश्याम म्हस्के, पै.नाना डोंगरे, सुधाकर कदम, शिवाजी होळकर, पोपट ढगे, साहेबराव बोडखे, सुभाष बारस्कर आदिंसह नगर तालुका व पारनेर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आदींसह नागरिक उपस्थित होते.

निंबळक येथील खंडोबा यात्रेनिमित्त माजी सरपंच कै. संजय लामखडे यांच्या स्मरणार्थ माधवराव लामखडे मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित आखाड्यात रंगलेला कुस्तीचा थरार. (छाया : वाजिद शेख, नगर)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*