महाराष्ट्रात पुन्हा आचारसंहिता; २३ जूनला मतदान

मुंबई :

लोकसभा निवडणुकीची धामधूम संपत नाही तोच महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा अंशतः आचारसंहिता लागू झाली आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून २३ जूनला यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

माहे जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत २० जिल्ह्यांमधील १४६ गावांमध्ये पंचवार्षिक मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि ६,७१९ सदस्यांच्या ठिकाणी पोटनिवडणुक आता होत आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज ३१ मे २०१९ ते ६ जून २०१९ या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. त्याची छाननी ७ जून रोजी होऊन अर्ज १० जूनपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप आणि प्रचारानंतर मतदान २३ जून रोजी होईल. मतमोजणी २४ जून रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.

ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
पुणे ३, सातारा ३, सांगली १, कोल्हापूर १, रत्नागिरी १, नाशिक ७४, उस्मानाबाद १, लातूर २, नांदेड १, पालघर ७, रायगड ८, धुळे १, जळगाव १, अहमदनगर १०, अकोला १, यवतमाळ ३, वाशीम १, बुलडाणा १, वर्धा ४ आणि चंद्रपूर २२.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*