विवेक ओबेरॉय याची नेटवर जोरदार धुलाई..!

मुंबई :

लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सध्या वेगवेगळ्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्यापैकीच एक पोस्ट शेअर करून विवेक ओबेरॉय हा अभिनेता सध्या चर्चेत आला आहे. महिलांच्या विरोधी पोस्ट असल्याने अनेकांनी त्याला ट्रोल करीत जोरदार शाब्दिक धुलाई केली आहे.

लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांचे फोटो टाकून पवन सिंग नावाच्या एका माणसाने ओपिनियन पोल, एक्झिट पोल व रिझल्ट याबद्दल कोटी करण्याचा प्रयत्न केला. हीच इमेज विवेकने आपल्या ट्विटरवर शेअर केली. त्यानंतर एकाच चर्चेचा धुराला उडाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये विवेक मोदींची भूमिका करीत आहे. तो सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. त्यातच विवेकाच्या या पोस्टला डीसलाईक ट्रेंड अनुभवण्यास मिळाला आहे. सुमारे २५ हजार लोकांनी त्यावर ट्विट करून पोस्ट शेअर केल्या आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*