काँग्रेसचाच विजय होणार : राहुल गांधी

दिल्ली :

देशभरात सध्या फ़क़्त एकाच विषयाची चर्चा सुरू आहे. तो विषय म्हणजे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता कोणाला कौल देणार. एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांनी एकमुखाने भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्याच पक्षाचा विजय होण्याचे ट्विट केले आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांनी ट्विटरवर पोस्ट करून न भिता सतर्कतेने कार्यरत राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यकर्त्यांनी पक्षासाठी मोठे काम केले आहे. त्यामुळे त्यांचे कष्ट निरुपयोगी ठरणार नाहीत. त्यांचे हे ट्विट कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेत दाद दिली आहे. तर, सत्तधारी भाजपच्या ट्रोलरने त्यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*