नमो की रागा; होणार जनतेच्या दरबारात फैसला..!

मुंबई :

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कोणत्या पक्षाला भारतीय जनता कौल देणार आणि कोणाचा ‘निकाल’ लावणार याचा फैसला गुरुवारी (दि. २३ मे २०१९) होणार आहे. यंदाची निवडणूक भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी (नमो) विरुद्ध कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (रागा) यांच्यात होत आहे.

२०१४ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भारतीय जनतेने एकहाती कौल लावला होता. मात्र, मागील पाच वर्षांत त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाल्याने यंदा नेमका कोणाचा विजय होणार याबद्दल कोणीही खात्री देत नाही. पाच वर्षांपूर्वी सत्ताधारी कॉंग्रेसच्या विरोधात लाट होती. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची क्लीन इमेजही कॉंग्रेसला त्यातून नाही वाचवू शकली.

त्यानंतर पहिली तीन वर्षे काँग्रेस कोमट गेली होती. मात्र, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गुजरात निवडणुकीच्या यशामुळे या पक्षाने पुन्हा एकदा उभारी घेतली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गांधी यांनी एकहाती टक्कर देत भाजपला जेरीस आणले. मात्र, तरीही विरोधकांमधील बेकीचा भाजपला फायदा होणार असल्याचे अनेक एक्झिट पोलमधून पुढे आले आहे. तर, भाजपने एकहाती विजयाच दावा केला आहे. त्याचाच निकाल गुरुवारी सायंकाळी लागणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*