मोदींना केदारनाथ कौल देणार का..?

मुंबई :

केदारनाथ हे हिंदू धर्मियांचे महत्वाचे धार्मिक स्थळ. चार धामापैकी एक असलेल्या या ठिकाणी जाऊन नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीमुळे भंगलेली मनाची शांती मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच यापूर्वीही केदारनाथला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट दिलेली आहे. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता कोणत्या पक्षाला कौल लावणार आणि भगवान केदारनाथ कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोदींनी केदारनाथ येथील एका गुहेत ध्यानधारणा केल्याच्या बातम्यांनी मागील आठवडा गाजला आहे. प्रत्येकवेळी काहीतरी वेगळे करून देशाचे लक्ष वेधणाऱ्या मोदींनी आपल्या करणीने विरोधकांना अनेकदा चकवा दिला आहे. यंदाही भाजपची स्थिती चिंतनीय असल्याचे त्याच पक्षाचे कार्यकर्ते बोलत असताना पुलवामा हल्ल्यानंतर राष्ट्रवाद आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यांना हवा देत नोटबंदी, जीएसटी, शेतकरी समस्या व कष्टकरी वर्गातील नाराजी गायब करण्यात त्यांनी यश मिळविले. त्याच हवेवर त्यांनी कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांना फिरवले.

अंतिम सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले की मोदींनी केदारनाथला जाऊन गुहेत राहण्याचा विक्रम केला. नैसर्गिक प्रकोप घडल्याने वाताहत झालेल्या केदारनाथ परिसराला चांगले करण्यासाठी मोदी व भाजपच्या टीमने विशेष काम केलेले आहे. त्यामुळेच भगवान केदारनाथ यंदाही मोदींना कौल देणार अशीच भाजपची श्रद्धा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*