अकोल्याच्या तिरंगी लढतीकडे राज्याचे लक्ष

अकोला :

विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीत यंदा कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. येथे भाजप, काँग्रेस व वंचित आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट तिरंगी लढत होत आहे.

२०१४ मध्ये येथून भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना मातादारांनी लोकसभेत जाण्याची संधी दिली होती. यंदाही पक्षाने ही उमेदवारी पुन्हा रिपीट केली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर धोत्रे यांना कशी लढत देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे पटेल व आंबेडकर यांनी आपापल्या विजयाचा दावा केला आहे.

येथील प्रमुख उमेदवार असे :

संजय धोत्रे (भाजपा)

हिदायत पटेल (काँग्रेस)

प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*