अमरावतीत हत्ती ठरविणार निकाल..!

अमरावती :

या जागेवर शिवसेना उमेदवाराचा विजय पक्का समजला जातो. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सेना खासदार आनंदराव अडसूळ यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या समर्थक उमेदवार नवनीत राणा-कौर यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. तरीही येथील विजयाचे गणित बसपचे उमेदवार अरुण वानखडे यांच्या मतदानावर ठरणार असल्याचे दिसते.

मागील लोकसभा निवडणुकीत या जागेवर सेनेचे उमेदवार अडसूळ यांना सुमारे सव्वालाखासह विजय मिळाला होता. मात्र, पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात जनतेचा भ्रमनिरास झाल्याने यंदा येथे राणा यांनी तयारीनिशी पुन्हा एकदा धडक दिलेली आहे. त्यात कोणाला विजय मिळणार हे हत्ती या चिन्हाला कोणाची व किती मत मिळतात यावर ठरणार आहे.

प्रमुख उमेदवार :

आनंदराव अडसूळ (शिवसेना)

नवनीत राणा-कौर (अपक्ष, आघाडी)

अरुण वानखडे (बसप)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*