पवार फॅक्टर ठरविणार नगरचा निकाल..!

अहमदनगर :

नगरच्या जागेवरील वाद आणि प्रतिवाद यातच यंदाची लोकसभा निवडणूक राज्यभरात संपली. काँग्रेसचे आमदार व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या बंडाळीने ही जागा देशभरात चर्चेत राहिली. येथून भाजपचे डॉ. विखे यांना राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी दिलेली लढत लक्षात घेता कोण विजयी ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

डॉ. विखे यांना उमदेवारी डावलून भाजपमध्ये जाण्यास भाग पाडण्यात महत्वाची भूमिका बजावली काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी. नगरच्या जागेवर त्यामुळेच थेट पवार विरुद्ध विखे अशी लढत रंगली. पवार साहेबांनी उमेदवार जगताप यांच्यासाठी मोठी ताकद लावली आहे. त्यातून जगताप यांचा विजय होणार की, नेहमीप्रमाणे येथील जनता लोकसभेसाठी भाजपच्या पाठीमागे जाणार हे निकालातून स्पष्ट होणार आहे.

रिंगणातील प्रमुख उमेदवार :

डॉ. सुजय विखे (भाजप)

संग्राम जगताप (राष्ट्रवादी)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*