उस्मानाबाद येथील पाटील विरुद्ध निंबाळकर लढतीकडे राज्याचे लक्ष

उस्मानाबाद :

उस्मानाबाद म्हटले की आठवते ती तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी आणि पद्मसिंह पाटील व निंबाळकर घराण्यातील राजकीय संघर्ष. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही हाच संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. त्यात कोणाची सरशी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

उस्मानाबाद येथील शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना यंदा उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी डावलली. त्यांच्याऐवजी या जागेवर पवन राजे निंबाळकर यांना सेनेने संधी दिली. तर, राष्ट्रवादीने येथून माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजीत सिंग यांना उमेदवारी दिली. या दुरंगी लढतीत कोण विजयी होणार हे निकालातून स्पष्ट होणार आहे.

रिंगणातील उमेदवार :

पवन राजे निंबाळकर (शिवसेना)

राणा जगजीत सिंग (राष्ट्रावादी)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*