औरंगाबादकर कोणाला बसविणार चौरंगावर..?

औरंगाबाद :

राज्यात सगळीकडे दुरंगी किंवा तिरंगी लढती होत असतानाच औरंगाबाद या मराठवाड्याच्या राजधानीत मात्र चौरंगी लढत होत आहे. येथील मताच्या फाटाफूटीचा कोणाला फायदा होणार, यावर येथील विजयाचे गणित ठरणार आहे.

शिवसेनेने यंदाही येथून खासदार चंद्रकांत खैरे यांनाच रीन्गांत उतरविले आहे. त्याच्याविरुद्ध नाराजीचा फटका बसू नये यासाठी भाजपही जीवाचे रान करीत आहे. त्याचवेळी कॉंग्रेसने येथून सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने आमदार अब्दुल सत्तार यांनी बंद पुकारीत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठींबा दिला आहे. तर, राज्यातील एकमेव जागेवर उमेदवारी देत आमदार इम्तियाज जलील यांना एमआयएमने संधी दिली आहे. या चौघांपैकी कोणाला औरंगाबाद शहर चौरंगावर बसविणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

रिंगणातील उमेदवार :

चंद्रकांत खैरे (शिवसेना)

सुभाष झांबड (काँग्रेस)

इम्तियाज जलील (एमआयएम)

हर्षवर्धन जाधव (अपक्ष)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*