महाडिक-मंडलिक यांच्यापैकी कोणाला पावणार महालक्ष्मी..?

कोल्हापूर :

पश्चिम महाराष्ट्रातील सधन आणि संपन्न जिल्हा म्हणजेच कोल्हापूर. मराठेशाहीच्या राजधानीसह महालक्ष्मी देवीमुळे याला विशेष महत्व आहे. त्याचवेळी गोकुळ या दुधासंघामुळेही कोल्हापूर सहकाराच्या नकाशावर आहे. त्याच नकाशावर कोणत्या खासदाराची सत्ता असणार हे लोकसभा निवडणूक निकालातून स्पष्ट होणार आहे.

येथून राष्ट्रवादीने खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. कॉंग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासह अनेकांनी त्यांना थेट विरोध केला आहे. तर, सेनेने येथून माजी खासदार सदाशिव मंडलिक यांचे पुत्र संजय यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंडलिक यांना ताकद दिल्याने येथे चुरशीची लढत झाली आहे. त्यात महालक्ष्मी देवी कोणाला पावणार हे गुरुवारी समजणार आहे.

कोल्हापूरचे उमेदवार :

धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)

संजय मंडलिक (शिवसेना)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*