चंद्रपूरमध्ये अहिर की धानोरकर..?

चंद्रपूर :

भाजपच्या हक्काच्या जागेपैकी एक म्हणजे चंद्रपूर लोकसभेची जागा असाच उल्लेख बातम्यांमध्ये असतो. मात्र, यंदा भाजपचे उमेदवार खासदार हंसराज अहिर यांना कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर यांनी जोरदार लढत देत जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

मागील १५ वर्षे या जागेवर भाजपचा वरचष्मा आहे. अहिर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यमंत्री पदावर काम करण्याचीही संधी दिली होती. त्यामुळेच भाजपला येथील विजय पक्का वाटत आहे. तर, चंद्रपूरच्या जागेसह विदर्भातील सर्व जागांवर काँग्रेस विजयी होण्याचा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

रिंगणातील उमेदवार :

हंसराज अहिर (भाजप)

सुरेश धानोरकर (काँग्रेस)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*