दानवे राखणार का खासदारकी..?

जालना :

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा एकहाती वरचष्मा असलेल्या जालना लोकसभेच्या जागेसाठी यंदा काँग्रेसने जोरदार आव्हान दिले आहे. सलग चार वेळा खासदार झालेल्या दानवे यांना काँग्रेसचे विलास औताडे रोखणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत २ लाखांपेक्षा जास्त मतांनी दानवे लोकसभेत गेले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री आणि मग प्रदेशाध्यक्ष ही पदे त्यांना भाजपने दिली. मात्र, त्यांनी उलट-सुलट वक्तव्य करून चर्चेत राहण्याचीच संधी साधली. त्यामुळेच त्यांना यंदा विजयाची परंपरा राखता येणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

रिंगणातील उमेदवार :

रावसाहेब दानवे (भाजप)

विलास औताडे (काँग्रेस)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*