दिंडोरीत पवार-महाले यांच्यात विजयाची रस्सीखेच

नाशिक :

द्राक्ष पट्ट्यातील दिंडोरी लोकसभेच्या जागेसाठी भाजप व राष्ट्रवादी यांच्यात उमेदवारांची पळवापळवी रंगली होती. त्यातूनच येथील विजयाचे गणित नेमके कोणाच्या बाजूने झुकणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

येथील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जीवा पांडू गावित जिंकण्याचा विश्वास कॉम्रेड मंडळी व्यक्त करीत आहेत. आदिवासींच्या मतावर त्यांचा विश्वास आहे. मात्र, तरीही येथील मुख्य लढत भाजपच्या डॉ. भारती पवार व राष्ट्रवादीचे धनराज महाले यांच्यात असल्याचे बोलले जात आहे. पुढील १२ तासांत याचे चित्र स्पष्ट होईल.

रिंगणातील उमेदवार :

डॉ. भारती पवार (भाजप)

धनराज महाले (राष्ट्रावादी)

जीवा पांडू गावित (सीपीआय)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*