साईबाबा कोणत्या पक्षाला पावणार..?

अहमदनगर:

नगर जिल्ह्यातील दक्षिणेच्या जागेच्या तुलनेत शिर्डीच्या खासदारकीची जागा कमी चर्चेत आहे. येथील राखीव जागेवर कोणाला खासदार होण्याची संधी मिळणार याकडे मात्र, राज्याचे लक्ष आहे. येथे यंदा चौरंगी लढत होत आहे.

शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याबद्दल नाराजी आहे. तीच लक्षात घेऊन येथून कॉंग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना लोकसभेत पाठविण्याची तयारी माजी मंत्री भाऊसाहेब थोरात यांनी केली आहे. तर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली ताकद सेनेच्या पाठीमागे उभी केली आहे. तसेच येथून माकपचे कॉम्रेड बन्सी सातपुते व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

शिर्डीचे प्रमुख उमेदवार :

सदाशिव लोखंडे (शिवसेना)

भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)

बन्सी सातपुते (माकप)

भाऊसाहेब वाकचौरे (अपक्ष)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*