महाराष्ट्र | भाजप २०, तर सेना १० जागांवर पुढे

अहमदनगर :

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजप व शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी ९ वाजेपर्यत भाजप २० ठिकाणी आघाडीवर आहे.

तर, मित्रपक्ष शिवसेना १० आणि काँग्रेस ७ व राष्ट्रवादी १० जागांवर आघाडीवर आहे. शिरूरमध्ये शिवसेनेचे आढळराव पाटील यांच्यापेक्षा राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी टपाली मतदानात आघाडी घेतली आहे. तर, नगरमध्येही सकाळी ९ वाजेपर्यत भाजपचे डॉ. सुजय विखे पायील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यापेक्षा जास्त मतदान मिळविले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*