पवार फॅक्टरला भारी पडला विखे फॅक्टर..!

अहमदनगर :

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विखे कुटुंबातील नवे नेतृत्व डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी न देण्याची भूमिका घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुगली फेकल्याची चर्चा होती. मात्र, मतमोजणीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे की, नगर जिल्ह्यात अजूनही पवार फॅक्टर नाही तर, विखे फॅक्टरचाच बोलबाला आहे.

डॉ. सुजय विखे यांनी ऐनवेळी भाजपवासी होत उमेदवारी पदरात पडून घेतली. त्यावर राष्ट्रवादीने येथून नगरचे तरुण आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विजयाची जबाबदारी पवार साहेबांसह कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली. पवार साहेबांनी जगताप यांच्या विजयासाठी जिल्ह्यात मुक्काम ठोकले. मात्र, तरीही मतमोजणीच्या दहाव्या फेरीपर्यत विखेंचे लीड १.७० लाखांपेक्षा जास्त गेलेले आहे. एकूणच या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नगर जिल्ह्यात विखे फॅक्टरचा बोलबाला राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*