अब की बार.. थेट ३०० पार..!

दिल्ली :

लोकसभा निवडणुकीत मोठ्या जोशाने प्रचार करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या भाजपने आपलं शब्दही खरा ठरविला आहे. अबकी बार मोदी सरकार अशी घोषणा मागील निवडणुकीत देत २८४ हा जादुई आकडा गाठणाऱ्या भाजपने यंदा तर थेट ३०० पार.. जात विरोधकांना झटका दिला आहे.

मतमोजणी सुरू असून सध्या देशातील एकूण राजकीय दिशा स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. विरोधी काँग्रेस पक्षाच्या जागा किमान दहाने वाढण्याची शक्यता दिसत असतानाच भाजपने एकट्याने ३०० या आकड्याला स्पर्श केला आहे. मतमोजणीनुसार निकाल वरखाली होत आहेत. मात्र, तरीही यंदा भाजप अमी मित्रपक्षांनी मिळून ३२५ पेक्षा जास्त जागांवर विजयाचा दावा पक्का केला आहे.

कॉंग्रेसला दुसऱ्या क्रमांकाच्या ५० जागा, तर पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता यांच्या तृणमूल कॉंग्रेसला २२ जागांवर आघाडी आहे. सायंकाळी उशिरा देशातील सर्व चित्र स्पष्ट होईल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*