नगर दक्षिणेत सुजयपर्व, तर जिल्ह्यात विखेपर्व..!

अहमदनगर :

नगर जिल्ह्यातील दक्षिण व शिर्डी या दोन्ही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आहे. या दोन्ही जागा धोक्यात असताना राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे या दोन्ही जागा महायुतीने खिशात टाकल्या आहेत. त्यामुळे दक्षिणेत सुजयपर्व, तर जिल्ह्यात विखेपर्व येणार हे निश्चित झाले आहे.

नगर जिल्ह्यात विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात असे राजकीय चित्र असते. तर, राज्यात विखेंना नेहमीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून विरोध केला जातो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी डावलून पवार व थोरात यांनी गुगली फेकली होती. जिल्ह्यातील विखे फॅक्टर गायब करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनी पुढाकार घेतला. त्याला राधाकृष्ण विखे यांनी जोरदार साथ दिली. त्यामुळे एकाचवेळी सुजयपर्व येत असतानाच जिल्ह्यात पुन्हा विखेपर्वही आल्याची चर्चा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*